Ad will apear here
Next
भिवंडीत पारंपरिक आदिवासी दिवाळी महोत्सव
भिवंडी : सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व आदिवासी विकास क्षेत्रात काम करणाऱ्या येथील विजेता विचार फाउंडेशन आणि जायंट्स ग्रुपचा सहेली ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने भिवंडीतील काटई येथील डोंगरपाडा दिवानमाल या आदिवासी पाड्यावर पाच नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत पारंपरिक आदिवासी दिवाळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

सध्या सगळीकडे दिवाळीची धामधूम सुरू असून, शहर व ग्रामीण भागात दिवाळीच्या खरेदीसाठी एकच लगबग दिसत आहे. अनेक सामाजिक संस्था व राजकीय पक्षांकडून खास दिवाळी पहाट कार्यक्रमही ठिकठिकाणी आयोजित केले आहेत. विजेता विचार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व डोंगरपाडा जिल्हा परिषद शाळेचे मुख्यध्यापक शामकांत नवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दर वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

या पारंपरिक आदिवासी दिवाळी महोत्सव कार्यक्रमाप्रसंगी डोंगरपाडा येथील परिसरातील जवळपास पाच ते सहा पाड्यातील सुमारे ३५०हून अधिक आदिवासी नागरिकांना एकत्र करत त्यांना दिवाळीनिमित्त कपडे, फराळ व मिठाई वाटप करण्यात येणार आहे; तसेच आदिवासींचे पारंपरिक तराफा नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. या वेळी भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौघुले, पंचायत समिती सदस्य गजानन असवारे, आदिवासी समाज मंडळ अध्यक्ष राम मोरगा यांच्यासह विजेता विचार फाउंडेशन जायंट्स ग्रुपच्या सहेली ग्रुपचे सहकारी व आदिवासी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक व विजेता विचार फाउंडेशनचे नवाळे यांनी दिली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZXRBU
Similar Posts
डोंगरपाडा जिल्हा परिषद शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम भिवंडी : तालुक्यातील डोंगरपाडा जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डोंगरपाडा आणि दह्याले शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध नृत्यांचे सादरीकरण केले.
मिलिंद जाधव यांना राज्यस्तरीय युवा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार भिवंडी : भांडुप येथील विकास प्रबोधिनी संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आंबेडकरी साहित्य संमेलनात मिलिंद जाधव यांना राज्यस्तरीय ‘युवा उत्कृष्ट पत्रकारिता २०१९’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मिलिंद जाधव यांना ‘इंडियन आयकॉन अॅवॉर्ड’ प्रदान भिवंडी : अजिंक्य युवा प्रतिष्ठान आणि एस. के. बंजारा फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित केलेल्या ‘युवा महोत्सव २०१९’ कार्यक्रमात विविध क्षेत्रांत यश मिळवलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यात कलाक्षेत्र विभागातून युवा कवी मिलिंद जाधव यांना ‘इंडियन आयकॉन अॅवॉर्ड २०१९’ देऊन गौरविण्यात आले.
भिवंडीत आदिवासींना विविध योजनांतर्गत आर्थिक मदत भिवंडी : नवीन वर्षाचे औचित्य साधून शहापूर येथील आदिवासी विकास विभाग एकात्मिक आदिवासी प्रकल्प व जनकल्याण आदिवासी सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भिनार जकात नाका येथे सहा जानेवारी २०१९ रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आदिवासी लाभार्थ्यांना केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language